राज बब्बर यांचं स्मिता पाटीलसोबत असलेल्या नात्यावर आतापर्यंत बरीच चर्चा झाली. राज बब्बर जेव्हा स्मिता पाटील यांच्यासोबत राहू लागले, त्यानंतर त्यांच्यावरील नात्यावर बरीच टीका करण्यात आली होती. स्मिता पाटील या राज बब्बर यांचा सुखी संसार मोडतेय, असा आरोप देखील स्मिता पाटील यांच्यावर लावण्यात आला होता. राज बब्बर आणि स्मिता पाटील हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम तर करत होते पण दोघांना लग्न करता आलं नाही. मरणाच्या आधी त्यांना सुवासिनी म्हणून जगायचं होतं, अशी स्मिता पाटील यांची इच्छा होती. पण त्यांची ही इच्छा अखेर पूर्ण झालीच नाही.
स्मिता पाटील या मनसोक्त जगणाऱ्या व्यक्ती होत्या. त्यांना मेकअप करणं फारसं आवडत नव्हतं. एकदा स्मिता पाटील राज बब्बर यांच्या चित्रपटाच्या सेटवर गेल्या होत्या. त्या सेटवर राज बब्बर यांच्यावर मेकअप सुरू होता. या सीनमध्ये राज बब्बर यांचा मृत्यू झाला असं दाखवणार होते. त्यावळी राज बब्बर यांच्यावरचा मेकअप पाहून मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांना स्वतःवर सुद्धा असाच मेकअप करण्यासाठी सांगितलं.
View this post on Instagram
स्मिता पाटील यांच्या मेकअप आर्टिस्ट दीपक यांनी एका माध्यमासोबत बोलताना सांगितलं, “मी राज बब्बर यांच्या मेकअप करताना पाहिल्यानंतर स्मिता पाटील यांनी सुद्धा तसाच मेकअप करण्यासाठी सांगितलं. एका मृत व्यक्तीचा मेकअप केल्यासारखं वाटेल म्हणून मी त्यावेळेला मॅडमना नकार दिला.” त्यावेळी स्मिता पाटील यांनी त्यांची शेवटची इच्छा दीपक यांच्याकडे व्यक्त केली होती. मरण पावल्यानंतर स्मिता यांना अगदी सुवासिनीसारखं सजवा, असं स्मिता पाटील म्हटल्या होत्या.
View this post on Instagram
‘भीगी पलके’ या चित्रपटादरम्यान राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्यातील प्रेमाला सुरूवात झाली होती. 80 च्या दशकात त्या दोघांनी लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरूवात केली. असं म्हणतात की, राज बब्बर हे आपल्या बायको नादिराला घटस्फोट देणार स्मिता यांच्याशी लग्न करणार होते. पण असं झालं नाही आणि नंतर त्यांनी स्मिता यांना आपल्या फ्रेंड सर्कलपासून दूर ठेवायला सुरूवात केली होती.
दोघांच्या नात्याबद्दल उलट सुलट चर्चा झाल्यानंतर राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांच्याशी थोडा दुरावा ठेवला. राज बब्बर यांची पहिली पत्नी नादिरा यांना घटस्फोट देऊन ते स्मिता पाटील यांच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार देखील होते. स्मिता पाटील यांना राज बब्बर यांच्याकडून एक मुलगा झाला. त्याचं नाव प्रतिक बब्बर आहे. प्रतिक बब्बर याच्या जन्मानंतर १५ दिवसांनी स्मिता पाटील यांचं निधन झालं.
स्मिता पाटील यांनी त्यांच्या १० वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘भूमिका’ आणि ‘चक्र’ चित्रपटासाठी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.