प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे. पण एकदा बॉलिवूड अभिनेते राज कुमार यांनी बप्पी लहरींची यामुळे खिल्ली उडवली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बप्पी लहरी हे शांत स्वभावाचे होते. त्यांची सुपरस्टार राज कुमार यांच्याशी पहिली भेट एका पार्टीमध्ये झाली होती. या पार्टीमध्ये बप्पी लहरी नेहमी प्रमाणे त्यांचे गोल्ड घालून आले होते. पण ते पाहून राज कुमार यांनी खिल्ली उडवली होती.
Bappi Lahiri : प्रसिद्ध गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन

एका पार्टीला राज कुमार यांनी बप्पी लहरी यांना पाहिले. त्यांच्या गळ्यातील सोने पाहून त्यांना हसू अनावर झाले होते. बप्पी लहरींची खिल्ली उडवत राज कुमार म्हणाले, ‘शानदार.. तू एकापेक्षा एक दागिने घातले आहेस. फक्त मंगळसूत्राची कमी आहे… तेही घालायचे होते.. जास्त चांगले वाटले असते.’ पण बप्पी लहरींनी त्याचा राग मानला नाही. त्यांनी पार्टीमध्ये मजामस्ती केली.

बप्पी लहरी यांनी वयाच्या २१व्या वर्षी बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kumar when meet bappi lahiri and made fun of his gold jewelry avb