शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचं नाव मागच्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर सातत्याने टीका झाली होती. एवढंच नाही तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. ते दोघंही वेगळे होणार अशाही चर्चा अनेकदा झाल्या होत्या. तसेच करण कुंद्रा पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतो असंही बोललं गेलं होतं. नुकत्याच सोशल मीडियावर घेतलेल्या एका सेशनमध्ये करण कुंद्राने या सर्व प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण कुंद्राने ट्विटरवर नुकतंच #AskRaj असं सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये युजर्सनी राज कुंद्राला त्याच्या खासगी आयुष्यापासून ते पॉर्नोग्राफी केसपर्यंत वेगवेगळे प्रश्न विचारले. याच सेशनमध्ये एका युजरने त्याला पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? असा प्रश्न विचारून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ज्यावर राज कुंद्राने त्याला सडेतोड उत्तर दिलंय. मागच्या वर्षी राज कुंद्राला याच प्रकरणामुळे अटकही झाली होती.

आणखी वाचा- “शिल्पा शेट्टीमुळे तुला लोक…” ट्रोलर्सना राज कुंद्राचं चोख उत्तर

ट्विटरवरील #AskRaj सेशनमध्ये एका युजरने राज कुंद्राला “सर तुम्ही अजूनही पॉर्न फिल्मचा व्यवसाय करता का?” असा प्रश्न विचारला होता. पण राज कुंद्राला असा प्रश्न विचारुन ट्रोल करण्याचा युजरचा प्रयत्न फसला. राजने या प्रश्नचं उत्तर दिलं. राज कुंद्राने त्या युजरला रिप्लाय देताना लिहिलं, “कधीच असं केलं नाही आणि कधी असं करणारही नाही.”

दरम्यान राज कुंद्रा मागच्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला होता. त्यानंतर त्याने बराच काळ सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. पण गणेश चतुर्थीनंतर तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. राज कुंद्रा मीडियापासून अद्याप दूर आहे. अनेकदा तो मास्क परिधान करूनच घराबाहेर पडतो. तसेच पॉर्नोग्राफी प्रकरणात लागलेले सर्व आरोप राज कुंद्राने फेटाळले आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे. या सगळ्या काळात शिल्पा शेट्टीने त्याला कायम साथ दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra answer to user who ask him question about porn film business mrj