बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनंतर राजला जामीनही मंजूर झाला होता. या प्रकरणानंतर राज कुंद्रा याने पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे. राज कुंद्रा याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी राज कुंद्राने पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या दोन्ही अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने ही सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली होती. राज कुंद्रा यांच्या कायदेशीर टीमकडून प्रशांत पाटील आणि स्वप्निल अंबुरे हे दोन वकील कोर्टात बाजू मांडत आहेत. “शर्लिन आणि पूनमने पैसे कमावण्याच्या उद्देशाने हे व्हिडीओ बनवले आहेत. त्यामुळे राज कुंद्राचा या व्हिडीओंशी काहीही संबंध नाही,” असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला आहे.

Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
SHIVA
Video : “तू कुठल्या अधिकाराने…”, शिवा-आशूमध्ये होणार पुन्हा भांडण; सिताई देणार नातं संपवण्याचा सल्ला, पाहा प्रोमो….
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
sanjay gaikwad mutton liquor
Video : “मतदारांना फक्त दारू मटण पाहिजे; ते विकले…”, संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, व्हायरल व्हिडीओने खळबळ
Transgender actress Shubhi Sharma
तृतीयपंथी अभिनेत्रीचा झाला अपघात; दुचाकी चालकाने दिली धडक, पोलिसांनी केली मदत
Jitendra Awhad
Jitendra Awhad : Video : घरावर पोलिसांची पाळत? पत्रकार परिषदेत घुसून चित्रीकरण केल्याचा आरोप; जितेंद्र आव्हाड संतापले; नेमकं काय घडलं?

यावेळी वकील स्वप्निल अंबुरे यांनी ‘ई टाईम्सला’ दिलेल्या माहितीनुसार, “शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेचे व्हिडीओ हे गुन्ह्याचा विषय आहेत, असा युक्तीवाद कोर्टात फिर्यादी पक्षाने केला. मात्र असे कोणतेही व्हिडीओ बनवण्यात किंवा शेअर करण्यात राज कुंद्राची कोणतीही भूमिका नाही, असे रेकॉर्डवर नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या दोघींनी स्वतः अशाप्रकारचे व्हिडीओ बनवून त्यातून पैसे कमवले आहे, हे सत्य आहे,” असा दावा स्वप्निल अंबुरे यांनी केला आहे.

तर वकील प्रशांत पाटील कोर्टात म्हणाले की, “आम्ही कोर्टात एक निकाल आणि छोटीसी प्रत सादर केली आहे. यात हे व्हिडीओ आयटी कायद्याच्या कलम ६७ (अ) अंतर्गत येत नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. एक्सप्लिसिट या शब्दाचा स्पष्ट शब्दात अर्थ असा होतो की ज्यात लैंगिक गोष्टी स्पष्टपणे दाखवण्यात आल्या असतील. तसेच ब्लॅक्स लॉ डिक्शनरीमध्येही जेव्हा दोन लोक एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवतात त्याला फिजिकल सेक्शुअल इक्वॉलिटीबद्दल असे म्हणतात. हे नमूद करण्यात आले आहे.”

त्यामुळे राज कुंद्राच्या दोन्ही वकिलांनी असे व्हिडीओ बनवणे, प्रसारित करणे किंवा वितरित करणे या कामाशी राज कुंद्राचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच यावेळी वकिलांनी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेचे आरोप फेटाळून लावले. या दोन्ही अभिनेत्रींचे स्वतःचे अॅप आहेत. दोघांकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ज्याद्वारे ते त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधू शकतात आणि यासाठी त्यांना सदस्यता घ्यावी लागली.

हेही वाचा : शिल्पा शेट्टी राज कुंद्रापासून विभक्त होणार? चर्चांना उधाण

दरम्यान राज कुंद्राच्या वकिलांची कोर्टात युक्तिवाद केल्यानंतर आत त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 25 नोव्हेंबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader