कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं बुधवारी (२१ सप्टेंबर रोजी) उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर २२ सप्टेंबर रोजी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील निगमबोध स्मशानभूमित त्यांच्या मुलाने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. कुटुंबीय, मित्र व चाहत्यांनी राजू यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर पत्नी शिखाने फोडला टाहो; रडत म्हणाली, “तो रुग्णालयातून…”

दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या शवविच्छेदनाबद्दल दिल्लीतील एम्स रुग्णालयाकडून माहिती समोर आली आहे. एम्सचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी बुधवारी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांचे पोस्टमॉर्टम ‘व्हर्च्युअल ऑटोप्सी’ या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले आहे. व्हर्च्युअल ऑटोप्सी नवीन तंत्रज्ञान हायटेक डिजिटल एक्स-रे आणि सीटी स्कॅनच्या मदतीने केली जाते आणि त्यासाठी जुन्या पोस्टमार्टम पद्धतीपेक्षा खूप कमी वेळ लागतो.

हेही वाचा – शुद्धीवर आल्यानंतर पत्नीशी फक्त चारच शब्द बोलू शकले होते राजू श्रीवास्तव; तेच ठरले अखेरचे

जागरनने दिलेल्या वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव रुग्णालयातच भरती होते, तरीही त्यांचं शवविच्छेदन करण्याची गरज होती का, असा प्रश्न डॉ. सुधीर गुप्ता यांना या प्रकरणी विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, ‘सुरुवातीला जेव्हा राजू श्रीवास्तव यांना एम्समध्ये आणलं होतं तेव्हा ते शुद्धीत नव्हते आणि ते ‘ट्रेडमिल’वर धावताना पडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पण तपासाअंती ते स्पष्ट होत नव्हते, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर आम्हाला शवविच्छेदन करावे लागले.’

हेही वाचा – Photos: राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने वाचवला होता आईचा जीव; जाणून घ्या शौर्य पुरस्कार विजेत्या अंतरा श्रीवास्तवबद्दल

राजू श्रीवास्तव १० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते बेशुद्ध पडले. राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत राजू यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj srivastava dead body post mortem done by virtual autopsy what doctor said hrc