‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. काल १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसे रीपोर्ट या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत आनंद दिघे हे रुग्णालयात असल्याचे दिसत असून राज ठाकरे त्यांच्या भेटीला गेले होते. हा फोटो शेअर करत “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे- धर्मवीर. धर्मवीर आनंद दिघे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्यातील हॉस्पिटल मधील शेवटचा संवाद”, असे कॅप्शन दिले आहे. चित्रपटातील सीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

आणखी वाचा : ठाण्यात आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम

आणखी वाचा : आनंद दिघे जयंती: टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘लांडगे’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार?

याशिवाय चित्रपटातील एक क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हिडीओत त्यांचा संपूर्ण संवाद दाखवण्यात आला आहे. दरम्यान, काल या चित्रपटाचा खास शो ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.