ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचे तोंडभरून कौतूक केले. अशोक सराफ दक्षिण भारतात असते, तर आज ते मुख्यमंत्री असते, असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> जावेद अख्तर यांना भेटल्यावर उर्फीने त्यांच्याकडे मागितली ‘ही’ गोष्ट, संभाषण शेअर करत म्हणाली…

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Raj Thackeray
Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Aditya Thackeray speaking about his criticism of the Adani Group's influence in Mumbai.
Aaditya Thackeray : “अदाणी समूह मुंबई गिळायला निघाला आहे”, आदित्य ठाकरेंचा घाणाघात
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

“अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. अशोक सराफ हे दक्षिणेत असते तर मुख्यमंत्री असते. ४०-४० फूट उंचीचे त्यांचे कटआऊट लावले असते. आपल्याकडे महाराष्ट्रात तसे काहीही नाही. कलावंत आहे का. मग ठीक आहे, एवढे बोलून आपल्याकडे विषय संपवला जातो. कलावंतांचं महत्त्व परदेशी गेल्यावर समजत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> Bigg Boss Marathi 4 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण? मेघा घाडगे म्हणाली….

“परदेशात कलावंतांच्या नावाने विमानतळं असतात. आपल्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. आपल्याकडे प्रतिमा जेवढी जपली जाते तेवढी प्रतिभा जपली जात नाही. मी अशोक सराफ यांचा कलावंत म्हणून नेहमीच आदर करत आलो. इतकी वर्षं लोकांना भूरळ घालणं तसेच सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं सोपी आणि साधी गोष्ट नाही. अशोक सराफ युरोपात असते तर त्यांच्या स्वागतासाठी आज मंचावर पंतप्रधान असते,” असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले.

“समोर कोणीही कलाकार असू देत अशोक सराफ यांना काहीही फरक पडला नाही. कोणत्याही चित्रपटात, नाटकामध्ये त्यांनी स्वत:चा प्रभाव कायम ठेवला. ही काही साधी गोष्ट नाही. मी त्या दिवशी त्यांचं व्हॅक्यूम क्लिनर नाटक पाहिलं. त्यांच्या प्रवेशाला नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. ५०-६० वर्षं स्वत:मधील कुतहूल जागं ठेवणं ही साधीसुधी गोष्ट नाही,” असेही राज ठाकरे म्हणाले.

Story img Loader