आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी लता दीदी अर्था लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. कुटुंबातूनच संगीताचा वारसा लाभलेल्या लतादीदींनी जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ संगीतक्षेत्रामध्ये आपले योगदान दिले आहे. लता दीदींना आजवर २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लता दीदींच्या वाढदिवसानिमित्ताने सिनेसृष्टीसह सर्वच क्षेत्रातून आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विटरवरून लता दीदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. “दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, ‘भारतीय गानकोकीळा’ लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ” असं म्हणत राज ठाकरेंनी लता दीदींसाठी एक खास कार्ड पोस्ट केलंय.

“1942 मध्ये गांधींजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा अवघा भारत ब्रिटिशांना उद्देशून भारत छोडो चा नारा देत होता, तेव्हा एका तेरा वर्षीय मुलीने भारतीय सिनेसृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर पुढची अनेक दशकं या गायिकेने आपल्या जादुई आवाजाने कोट्यवधी भारतीयांच्या मनोजगतावर राज्य केलं. त्या गायिकेचं नाव लता मंगेशकर. आपल्या सर्वांच्या लतादीदी!” असं या कार्डमध्ये म्हंटलंय.

नीरज चोप्राने केलं शक्ती मोहनला प्रपोज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

“दीदींचा आवाज म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतीयांची स्वप्नं-आशा-आकांक्षा यांचं प्रतीक आहे. म्हणूनच तर त्यांच्या आवाजाला वय नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश असे कोणतेही शिक्के नाहीत. दीदींचा आवाज म्हणजे एक निखळ सूर आहे, ज्याचा जन्म जरी वेदनेतून झाला असता तरी त्यात आत्मा-परमात्मा यांच्या अद्वैताचा साक्षात्कार आहे.” असं म्हणत राज ठाकरेंनी दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या भारतीय गानकोकीळा लतादीदींना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Birthday Special: मौनी रॉयचं भुरळ घालणारं सौंदर्य

लता दीदींना २००१ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. याशिवाय, १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’, १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.