महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कायमच त्यांच्या खास शैली आणि रोखठोक स्वभावामुळे ओळखले जाते. राज ठाकरे यांचे सूपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. अमित ठाकरे यांच्या विनम्रतेचे अनेकदा कौतुक केले जाते. ते त्यांच्या वयापेक्षा अधिक असलेल्या वरिष्ठ नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा कायमच मान ठेवतात. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अमित ठाकरे आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित ठाकरे यांना लोकमत या वृत्तपत्राकडून ‘लोकमत मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन’ हा खास पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी अमित ठाकरे सहकुटुंब पोहोचले होते. त्यांच्याबरोबर त्याच्या मातोश्री शर्मिला ठाकरे आणि पत्नी मिताली ठाकरेही उपस्थित होत्या. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यानच्या अमित ठाकरेंच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
आणखी वाचा : “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

या कार्यक्रमाला बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि संवेदनशील कलाकार जॅकी श्रॉफही उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान सगळ्यांच्या गाठीभेटी सुरु होत्या. यावेळी समोर जॅकी श्रॉफ यांना पाहताच शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे त्यांच्या दिशेने गेल्या. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत हात मिळवला. त्यावेळी त्यांनी जग्गूदादांची आदराने विचारपूस केली. यानंतर अमित ठाकरेंनीही जॅकी श्रॉफ यांच्यासोबत हात मिळवला आणि त्यानंतर थेट पायाला हात लावून नमस्कार केला. अमित ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी मिताली हिनेही जॅकी श्रॉफ याच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतले.

आणखी वाचा : “बिग बॉस आदेश देत आहे की…” आवाजामागचे गुपित उलगडले

हे सर्व पाहून जॅकी श्रॉफ यांनाही अवघडल्यासारखं वाटलं. त्यांनी त्याक्षणी अमित ठाकरे यांच्या हाताला पकडलं. तर दुसरीकडे अमित ठाकरेंची ही विनम्रता पाहून तिथे उपस्थित सर्वजण भारावले. हा संपूर्ण प्रसंग अमित ठाकरे यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे पाहत होत्या. त्यावेळी त्यांनाही लेकाचे आणि सूनेचे प्रचंड कौतुक वाटले.

दरम्यान यावेळीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे हे जॅकी श्रॉफ यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी शर्मिला ठाकरे या काही किस्से सांगतानाही पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडला असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मनसे नेत्यांसह अनेक नेते मंडळी अमित ठाकरे यांच्या साधेपणाचं आणि विनम्रतेचं कौतुक करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray son amit thackeray humility touched feet jackey shroff video goes viral nrp