२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी भाषेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, तरीदेखील मराठी भाषा आणि मराठी व्यक्तीची पीछेहाट होत असून इतर भाषांच्या हस्तक्षेपामुळे मराठी भाषा मृतवत होत असल्याचं नेहमीच बोललं जात आहे. यासंदर्भात आता मराठी भाषेचा कायम आग्रह धरणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी टिकवण्यासाठी आधी मराठीत बोलणं गरजेचं आहे. मराठी बोलताना लाज वाटायची गरज नाही असं मत व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मुलाखतीत राज ठाकरे ‘पुष्पा’ चित्रपटा विषयी म्हणाले, “तो चित्रपट जेव्हा हिंदीत आला नव्हता. तेव्हा तुमच्यातले आणि माझ्या काही ओळखीच्या लोकांनी तेलगूमध्ये पुष्पा पाहिला आहे. माझा एक मित्र आला आणि म्हणाला पुष्पा, मला पहिले कळलं नाही कारण मला ते काय आहे हे माहित नव्हतं, तेव्हा तो चित्रपट नुकताच आला होता. तो मला म्हणाला की पुष्पा चित्रपट बघ आणि तेलगू चित्रपट आहे. मी म्हणालो, तू तेलगूत पाहिला. तर चित्रपटाला भाषेची गरज नाही असं त्याने सांगितलं. चित्रपट पाहिल्यावर मला कळलं की भाषेची गरजच नाही त्याला.”

आणखी वाचा : ‘झुंड’ मराठीत का नाही केला? नागराज मंजुळे म्हणाले; “मग मी म्हणतो पुष्पा..”

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

पुढे राज ठाकरे म्हणाले, मला असं म्हणायचं आहे. तुम्ही तुमच्या गोष्टीवर ठाम राहा ना. त्यांनी नंतर त्या लोकांनी पैशांचा व्यवहार केला आणि चित्रपट हिंदीत आणि इतर भाषेत आणला वगैरे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray talks about pushpa movie as people are not respecting marathi language dcp