बॉलिवूडचे भिडू जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ हे त्यांच्या स्वभावामुळे आणि अनोख्या स्टाईलमुळे ओळखले जातात. त्यांच्या विनोदी बुद्धीमुळे त्यांनी अनेकांची मनं जिंकली आहे. ते विविध कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळी जॅकीने एका कार्यक्रमातील फिटनेसबाबत आणि मराठी संभाषणाबाबत एक वक्तव्य केले आहे.

प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकतंच पार पडला. या कार्यक्रमात जनरेशन XL या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ गायिका आशा भोसले इत्यादी दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. लोअर परळच्या कोरम क्लबमध्ये हा सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमात बोलताना जॅकी श्रॉफने त्याच्या फिटनेसबद्दल सांगितले.

“डॉक्टर हे देवासारखे असतात. ते लहान मुलांना फार प्रेमाने सांभाळतात. आपण आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण त्यांना जे खायला देतो, त्याचे अप्रत्यक्षरित्या परिणाम हे त्यांच्या शरीरावर होत असतात. त्यामुळे मुलांना फ्राईड फूड देणे शक्यतो टाळलं पाहिजे. तसेच त्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे”, असे जॅकी श्रॉफ म्हणाले.

“राज ठाकरे हे माझे फार पूर्वीपासूनचे मित्र आहेत. त्यांनी मला फार आधी एक गोष्ट सांगितली होती. जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला मराठीत बोलता आलं पाहिजे. मला स्पष्ट मराठी बोलता येत नाही पण मी प्रयत्न करतो”, असे त्यांनी म्हटले.

Video : ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर अमृता खानविलकर तुळजाभवानीच्या चरणी, म्हणाली “प्रमोशनच्या गडबडीत…”

“माझा मित्र आता आजोबा झाला आहे. तुम्ही सुरकुत्या असलेले लोक आजोबा झालेले पाहिले असतील पण राज ठाकरे हे ट्रेंड चेंजर आहे. ते खूपच तरुण दिसतात”, असेही जॅकी श्रॉफ गंमतीने म्हणाले.

Story img Loader