अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत येत असते. दोन लग्न आणि घटस्फोटामुळे श्वेताचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं आहे. श्वेता सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच श्वेताने शेअर केलेल्या हॉट फोटोंवर पहिल्या पतीने कमेंट केल्यामुळे श्वेता तिवारी सध्या चर्चेत आहे.

श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट अंदाजात दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

दरम्यान श्वेताचा पहिला पती राजा चौधरीने देखील या फोटोवर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर’ असे त्याने कमेंटमध्ये म्हटले आहे. सध्या राजाची ही कमेंट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न करण्यापूर्वी १९९८ साली राजाशी लग्न केले होते. मात्र त्यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. पलक ही श्वेता आणि राजाची मुलगी आहे. मार्च महिन्यात राजा तिला भेटला होता. जवळपास १३ वर्षांनंतर राज आणि पलकची भेट झाली होती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर तिच्या सोबतचे काही फोटो शेअर केले होते.