मिस युनिव्हर्स, बॉलिवूडची अभिनेत्री सुश्मिता सेन अधूनमधून चर्चेत असतेच. ललित मोदी प्रकरणात तिला ट्रोल करण्यात आले होते. लवकरच सुश्मिता ‘ताली’ या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुश्मिता या वेब सीरिजवर काम करत आहे मात्र सध्या तिचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांच्यातील वाद मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. या दोघांच्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे.
या सगळ्या प्रकरणात सुश्मिताने मात्र तिच्या भाचीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने जियानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, तुझ्यावर देवाची कृपा राहो तसेच तुझ्यामुळे आमच्या आयुष्याला प्रतिष्ठा मिळाली आहे’, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जियाना राजीव सेन चारू असोपा यांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मुलगी जियानासाठी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मात्र यांच्या नात्यात पुन्हा दुरावा आल्याचं बोललं जात आहे.
अजय देवगणच्या भोला चित्रपटात झळकणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री!
दरम्यान राजीव आणि चारू यांनी काही दिवसांपूर्वीच फॅमिली फोटो शेअर करत त्यांनी घटस्फोटाचा निर्णय बदलला असल्याची आणि लग्नाला दुसरी संधी देत असल्याची घोषणा केली होती. यानंतर दोघंही पुन्हा प्रेमाने राहत असलेले पाहायला मिळाले होते. पण आता हे सर्व फोटो त्यांनी डिलिट केले आहेत. एवढंच नाही तर एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे.
गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित लवकरच ‘ताली’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी वेब सीरिज ‘ताली’चा लूक शेअर केला आहे. या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर असणार आहे