बॉलिवूडमधले पहिले मेगास्टार राजेश खन्ना यांची आज पुण्यतिथी. १८ जुलै २०१२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेऊन नऊ वर्ष झाली. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वडिलांची आठवण काढत मुलगी ट्विंकल खन्ना हिने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये राजेश खन्ना ‘सुनो कहो कहा सुना’ या सुपरहिट गाण्याचं शूटिंग करताना दिसून येत आहेत. ट्विंकल खन्नाने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे मेगास्टार राजेश खन्ना यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये राजेश खन्ना त्यांच्या शूटिंगला किती एन्जॉय करत होते, हे दिसून येतं. गाण्याच्या शूटिंगनंतर एक मुलाखत देताना ते दिसून येत आहेत. या मुलाखतीत राजेश खन्ना शूटिंगमधला अनुभव व्यक्त करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना ट्विंकल खन्नाने वडिलांसाठी एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “माझ्याकडे त्यांचे डोळे आहेत…माझ्या मुलामध्ये त्यांची स्माइल आहे…आणि जगभरातील अनेकांच्या ह्दयात त्यांच्या आठवणी आहेत…ज्यात ते आजही जिवंत आहेत. ”
View this post on Instagram
वडील राजेश खन्ना यांच्या आठवणीत ट्विंकल खन्नाने शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत साडे पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. आज राजेश खन्ना यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जगभरातील फॅन्सनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना आजही आपल्या वडिलांची आठवण काढत असते, असंच त्यात दिसतं.
आज राजेश खन्ना जरी आपल्यात नसले तरी त्यांचा अभिनयासोबत त्यांचा एक डायलॉग मात्र फॅन्सच्या मनाला भावतो. “बाबूमोशाय……. बाबू मोशाय जिंदगी और मौत उपरवाले के हात है जहाँपणा…जिसे ना तो आप बदल सकते है ना मै…. हम सब तो रंगमंच की कटपुतलीया है, जीसकी डोर उपरवालेकी उंगलीओमे बंधी है….कब कोन कैसे उठेगा कोई बता नहीं सकता…..” आनंद कभी मरते नहीं वह हमेशा याद रहते है….” या डॉयलॉग प्रमाणेच राजेश खन्ना आजही लाखो फॅन्सच्या मनात जिवंत आहेत.