हिंदी सिनेमामधील सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत काम करता यावं अशी त्या काळातल्या प्रत्येक सुपरहिट अभिनेत्रींची इच्छा होती. यामागचं कारणही तसंच होतं. त्यावेळी राजेश खन्ना यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशाचा नवा इतिहास घडवत होता आणि त्यासोबत त्यांच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्रींचं करिअर सुद्धा…अभिनेत्री शबाना आझमी या पहिल्यापासूनच आर्ट फिल्मसाठी ओळखल्या जातात. पण राजेश खन्ना यांच्यासोबत ‘नसीहत’ चित्रपटात शबाना आझमी यांना ग्लॅमरस अंदाजात पाहून आजही तुम्ही आश्चर्य व्हाल. तसं पहायला गेलं तर शबाना आझमी यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत ‘अमरदीप’, ‘अवतार’ ,’अशांत’ ‘थोड़ी सी बेवफाई’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केलंय. पण ‘नसीहत’ चित्रपटात या दोघांची जोडी सुपरहिट ठरली. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक मजेदार किस्सा अभिनेत्री शबाना आझमी यांनी शेअर केलाय.

‘नसीहत’ रिलीज होण्यासाठी ४ वर्ष लागले

हिंदी सिनेमातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अरविंद सेन यांचा ‘नसीहत’ चित्रपट १९८६ मध्ये रिलीज झाला होता. दिग्दर्शक अरविंद सेन यांनी सुपरस्टार राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांना एकत्र घेऊन चित्रपट बनवण्यासाठी १९८२ मध्ये सुरूवात केली होती. अखेर ४ वर्षांनंतर म्हणजेच १९८६ मध्ये ‘नसीहत’ हा चित्रपट रिलीज झाला. पण जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये पोहोचला तेव्हा यशाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”

आजच्या काळात चित्रपटसृष्टीत बऱ्याच नव नव्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत. चित्रपटाच्या क्रू मेंबर्ससोबत या आणि पूर्ण चित्रपट शूट करून टाका, असं करून आज चित्रपट तयार केले जातात. आजच्या युगात चित्रपटाचं शूटिंग असो वा गाण्याचं रेकॉर्डींग, या सगळ्यात टेक्नॉलॉजीची कमाल आहे. सुरूवातीच्या काळा चित्रपटातील मुख्य नायकाप्रमाणेच इतर कलाकारांना सुद्धा बरीच मेहनत घ्यावी लागायची, तेव्हा कुठे जाऊन एक चित्रपट तयार होत असे. असाच एक किस्सा अभिनेत्री शबाना आझमी यांनी शेअर केलाय.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्री शबाना आझमी म्हणाल्या, ” आजच्या काळात चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी योग्य कॉल शीट्स असतात, परंतु पूर्वीच्या काळात असं नव्हतं. मला आठवतंय जेव्हा मी आणि राजेश खन्ना आम्ही दोघे अरविंद सेनच्या ‘नसीहत’ साठी खारमध्ये एकत्र शूट करत होतो, तेव्हा कादर खान आरके स्टुडिओमध्ये बसून पुढचा सीन लिहित होते. त्यावेळी आम्ही कलाकार चित्रपटाची सत्यता सांभाळू शकलो हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही.”

सुपरस्टार राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्या व्यतिरिक्त, ‘नसीहत’मध्ये अभिनेते कादर खान, मिथुन चक्रवर्ती आणि दीप्ती नवल यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटातील ‘झनक-झनक झांझर बाजे’, ‘मेरा मन देखे सपना’, ‘तेरे मेरे प्यार की कुंडली’ ही गाणीही खूप गाजली होती. या चित्रपटातील संगीत प्रसिद्ध संगीतकार कल्याण जी आणि आनंद जी यांनी दिले होते.

Story img Loader