बॉलिवूडचा सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या प्रथम स्मृतीदिनादिवशी अभिवादन म्हणून त्याचा पुतळा वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथील यश चोप्रा, देव आनंद आणि राज कपूर या महान व्यक्तींच्या पुतळ्यांच्या रांगेत बसविण्यात येणार आहे. मागील वर्षी १८ जुलै रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी राजेश खन्नांचे ‘आशीर्वाद’ या त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. राजेश खन्नांच्या जादूई हसण्यावर अनेक तरूणी फिदा होत्या. त्यांच्या रोमॅन्टिक अदाकारीने कित्येक तरूणींना भुरळ घातली होती.
पितळी धातूपासून बनवलेल्या या पुतळ्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतल्या नामांकित व्यक्तींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात येईल. राजेश खन्ना हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. १९६९ ते १९७२ हा चित्रपटसृष्टीतला त्यांचा सुवर्णकाळ होता . या दरम्यान त्यांनी सलग १५ हिट चित्रपट दिले. त्यांची ही कामगिरी अजूनही अबाधीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा