मराठी चित्रपटसृष्टीत तारकांची काही कमतरता आहे का सांगा, तरी पंजाबी कुडी एका नव्हे तर तब्बल पाच मराठी चित्रपटातून चमकली. राजेश्वरी सचदेव हे त्या पंजाबी युवतीचे नाव आहे.
वीस वर्षापूर्वी सचिन पिळगावकरने तिला ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटाव्दारे मराठीत आणले. तिचे कौटुंबिक चित्रपटाला साजेसे व्यक्तिमत्व पाहून अण्णासाहेब देऊळगावकर यानी तिला ‘साखरपुडा’ चित्रपटात स्थान दिले. त्याशिवाय ती ‘चिंटू’, ‘आघात’ अशा मराठी चित्रपटाद्वारे अपल्या समोर आली.
आता, ती ‘संहिता द स्क्रीप्ट’ या चित्रपटात राजगायिकेच्या भूमिकेत दिसेल. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित या चित्रपटात  ती मिलिंद सोमण (राजा) आणि देविका दफ्तरदार (राणी) यांच्यासोबत दिसेल.
ती सांगत होती, मी मुंबईकर असल्याने माझे मराठी खूप चांगले आहे आणि मराठी चित्रपटातून सतत काम केल्याने ते चांगले राहिले,  विशेष म्हणजे मी पंजाबी असले तरी आतापर्यन्त एकाच पंजाबी चित्रपटातून मी भूमिका साकारली आहे. पण गंमत म्हणजे त्या चित्रपटाच्या सेटवर मी ब-याचदा मराठीत बोलायचे. हिंदी चित्रपटाच्या सेटवर मराठी बोललेले चालते, कारण तेथे बरेच तंत्रज्ञ आणि कामगार महाराष्ट्रीयन आहेत. राजेश्वरी हे सगळं शुध्द मराठीत सांगत होती म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा