दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला ‘2.0’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील व्हीएफएक्सवर तब्बल ५५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून VFXची किमया या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. रजनीकांतच्या ‘रोबोट’ चित्रपटाचा हा सिक्वल असून यामध्ये अक्षय डॉ. रिचर्ड या खलनायकाची भूमिका साकारत आहे. या si-fi म्हणजेच सायन्स आणि फिक्शन चित्रपटात प्रेक्षकांना भरभरून अॅक्शनसुद्धा पाहायला मिळणार आहे. ‘2.0’च्या माध्यमातून अक्षय आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाहा ट्रेलर-

टेलिकॉम कंपन्यांचा सूड घेण्यासाठी डॉ. रिचर्ड संपूर्ण शहरातील लोकांकडून मोबाइल हिसकावून घेतो असं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. या दृश्याच्या चित्रीकरणासाठी तब्बल एक लाख मोबाइल्सचा वापर करण्यात आला.

या चित्रपटासाठी जगभरातील ३००० हून अधिक तंत्रज्ञांनी काम केलं असून त्यापैकी १००० व्हीएफएक्स कलाकार आहेत. ‘2.0’ हा चित्रपट भारतातील सर्वांत महागडा आणि आशिया खंडातील सर्वाधिक बजेटचा दुसरा चित्रपट आहे. त्याप्रमाणे थेट 3D कॅमेऱ्याने शूट करण्यात आलेला हा देशातला पहिला चित्रपट आहे. सर्वसाधारणपणे चित्रपटाची शूटिंग ही 2D कॅमेरामध्ये होते आणि स्टुडिओत एडिटिंगद्वारे ते 3Dमध्ये रुपांतरित करण्यात आलं. २९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रजनीकांत, अक्षय कुमारसोबतच अॅमी जॅक्सनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाचं बटेज आणि कलाकार पाहता सगळ्यांनाच या चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth and akshay kumar starrer 2 point 0 movie trailer released