सुपरस्टार रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील १७० वा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘वेट्टैयन’ हा त्यांचा आगामी सिनेमा आहे. या तमीळ अ‍ॅक्शनपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम शुक्रवारी पार पडला; ज्यात अभिनेता रजनीकांतही उपस्थित होते. या कार्यक्रमात रजनीकांतने सिनेमाविषयी आपलं मत मांडलं. मात्र, या सोहळ्यात एक गोष्ट लक्षवेधी ठरली आणि ती म्हणजे थलाईवा रजनीकांत यांचा डान्स. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्याबरोबर स्टेजवर डान्स करीत रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना खुश केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात रजनीकांत ‘मनसिलायो’ या आगामी ‘वेट्टैयन’  या चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

‘वेट्टैयन’ सिनेमातील ‘मनसिलायो’ हे गाणे सोशल मीडिया आणि रील्सवर प्रचंड व्हायरल होत आहे. याच गाण्यावरील रजनीकांत यांच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहत्यांसाठी ती पर्वणीच ठरत आहे.

हेही वाचा…रणबीर कपूर लेक राहासाठी गातो चक्क मल्याळम अंगाई, तर आजी सोनी राजदान गातात ‘हे’ गाणं

व्हायरल व्हिडीओमध्ये ७३ वर्षीय रजनीकांत आणि संगीतकार अनिरुद्ध ‘मनसिलायो’ गाण्याच्या हुक स्टेपवर नाचताना दिसत आहेत. यावेळी रजनीकांतने, “अनिरुद्ध हा माझ्या मुलासारखा” असल्याचं म्हटलं. यावेळी अनिरुद्धने रजनीकांत यांच्या पायांना स्पर्श केला. यानंतर थलाईवा रजनीकांतने अनिरुद्धला मिठी मारली.

अनिरुद्धने यापूर्वी रजनीकांतच्या ‘पेट्टा’, ‘दरबार’ व ‘जेलर’ या चित्रपटांसाठीही संगीत दिलं आहे. त्यायपैकी ‘जेलर’ हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता.

‘वेट्टैयन’ चित्रपटाचं दिग्दर्शन टी. जे. ज्ञानवेल यांनी केलं आहे; ज्यांनी यापूर्वी तमीळ कोर्टरूम ड्रामा ‘जय भीम’चं दिग्दर्शन केलं होतं.” त्यात अभिनेता सूर्या प्रमुख भूमिकेत होता. ऑडिओ लाँचमध्ये बोलताना रजनीकांतने दिग्दर्शकाला सांगितले, “असा चित्रपट बनवावा, जो लोक साजरा करतील.” कारण- आता ते स्वतः ‘संदेशात्मक चित्रपट’ करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…मुन्नाभाई MBBS मध्ये संजय दत्तऐवजी शाहरुख खान, तर अर्शदच्या जागी ‘हा’ मराठी अभिनेता करणार होता काम, पण…

हिट सिनेमाचे दडपण

रजनीकांत पुढे म्हणाले, “जर तुम्ही फ्लॉप चित्रपट दिलात, तर लोकांना तुमच्याकडून हिट चित्रपटाची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही हिट चित्रपट दिलात, तर तुमच्यावर हिटचा स्तर कायम ठेवण्याचं दडपण असतं. ‘जेलर’च्या हिटनंतर हीच स्थिती निर्माण झाली आहे.”

हेही वाचा…फरहान अख्तर-अधुनाच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया काय होती? अभिनेता खुलासा करत म्हणाला, “त्यांनी भावनिक धक्का…”

अमिताभ बच्चन यांचे तमीळ सिनेसृष्टीत पदार्पण

‘वेट्टैयन’ चित्रपटात रजनीकांत यांच्यासह अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन यांचा हा पहिलाच तमीळ सिनेमा आहे. तर, १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम’ चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ‘वेट्टैयन’मध्ये फहाद फासिल, राणा दग्गुबती, मंजू वॉरियर, रितिका सिंग, दुषारा विजय व व्ही. जे. राक्षन हेदेखील प्रमुख भूमिका साकारत आहेत. ‘वेट्टैयन’ १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.