Dhanush and Aishwarya Rajinikanth Divorce : दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या व तमिळ अभिनेता धनुष कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांचा २० वर्षांचा संसार मोडला आहे. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. अखेर त्यांचा घटस्फोट मंजूर झाला आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी, प्रसिद्ध निर्माती ऐश्वर्या व तमिळ अभिनेता धनुष यांनी जानेवारी २०२२ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विभक्त होणार असल्याची माहिती दिली होती. धनुष व ऐश्वर्या यांचा आता अधिकृत घटस्फोट झाला आहे. चेन्नई कौटुंबिक न्यायालयाने बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी या जोडप्याला घटस्फोट मंजूर केला. काही मतभेदांमुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याला यात्रा आणि लिंगा ही दोन मुलं आहेत.

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव? दुबईतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

धनुष-ऐश्वर्याची लव्ह स्टोरी

धनुष व ऐश्वर्या यांनी २००४ मध्ये लग्न केलं होतं. दोघांची लव्ह स्टोरी एक चित्रपटापेक्षाही काही कमी नाही. या दोघांची पहिली भेट एका शो दरम्यान झाली होती. एका मुलाखतीत धनुषने त्याची लव्हस्टोरी सांगितली होती. “माझा चित्रपट कादल कोंडेन रिलीज झाल्यानंतर एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी मी माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर गेलो होतो. जेव्हा चित्रपटाचा इंटर्व्हल झाला त्यावेळी आम्ही दोघे एकमेकांना भेटलो.”

Dhanush and Aishwarya Rajinikanth granted divorce
ऐश्वर्या रजनीकांत व धनुष यांचा घटस्फोट (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल म्हणाला, “मला माहीत आहे की ऐश्वर्या…”

चित्रपट संपल्यानंतर सिनेमा हॉलच्या मालकांनी धनुषला रजनीकांत यांच्या मुली सौंदर्या आणि ऐश्वर्या यांची ओळख करून दिली होती. त्यावेळी त्यांनी एकमेकांना केवळ हाय केलं आणि तिथून निघाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ऐश्वर्याने धनुषला एक बुके पाठवलं आणि त्यावर लिहिलं होतं, “गुड वर्क, कीप इन टच”. ऐश्वर्याचं म्हणणं खूपच गांभीर्याने घेतलं, असं धनुष मिश्किलपणे म्हणाला होता.

हेही वाचा – ‘बाहुबली’ फेम अभिनेता ४७ व्या वर्षी अडकला लग्नबंधनात, पत्नीबरोबरचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो केला शेअर

ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. धनुषची बहीण ऐश्वर्याची खूप चांगली मैत्रीण होती. दोघांच्या भेटीगाठी वाढल्यावर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांनी घाईघाईने धनुष-ऐश्वर्याच्या लग्नाचा निर्णय घेतला आणि याची घोषणा सुद्धा केली. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी धनुष केवळ २१ वर्षांचा तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती. या दोघांचा लग्न सोहळा खूपच शानदार पद्धतीने रजनीकांत यांच्या घरीच पार पडला होता.

Story img Loader