दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा जेलर चित्रपट गुरुवारी (१० ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची दाक्षिणात्य राज्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच चेन्नईच्या क्रोमपेट भागातील वेत्री थिएटरबाहेर ‘जेलर’ चित्रपटाला नकारात्मक रिव्ह्यू दिल्याबद्दल रजनीकांत यांच्या चाहत्यांनी दोन व्यक्तींना मारहाण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जबरा फॅन! जपानी चाहता रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट पाहण्यासाठी पत्नीसह भारतात पोहोचला; म्हणाला…

रजनीकांत यांचे चाहते गुरुवारी त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आनंद साजरा करण्यासाठी चेन्नईतील वेगवेगळ्या थिएटरमध्ये जमले. त्यांनी फटाके फोडले, रजनीकांत यांची पूजा केली आणि चित्रपटाच्या गाण्यांवर डान्स केला. वेत्री थिएटरमध्ये चाहत्यांनी चित्रपटाचा संगीतकार अनिरुद्धबरोबर ‘हुक्कूम’ गाणे गायले. यावेळी फर्स्ट डे फर्स्ट शो पहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘जेलर’ चित्रपटाचे नकारात्मक रिव्हूय दिल्याबद्दल रजनीकांत यांच्या चाहत्यांनी दोन व्यक्तींना मारहाण केली.

हाणामारी झाल्यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांनी असा दावा केला की ते दोघे थलपती विजयचे चाहते होते म्हणून ते रजनीकांत यांच्या चित्रपटाचे नुकसान व्हावे, यासाठी निगेटीव्ह रिव्ह्यू देत होते. ‘जेलर’ ऑडिओ लाँचदरम्यान रजनीकांत यांनी म्हटलं होतं की त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांना नेल्सन दिलीपकुमारसोबत काम करण्याआधी दोनदा विचार करण्याचा सल्ला दिला होता. कारण विजयची मुख्य भूमिका असलेल्या त्यांच्या ‘बीस्ट’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या वक्तव्यानंतर रजनीकांत व विजयच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर वाद झाला होता.

दरम्यान, ‘जेलर’ चित्रपटात मोहन लाल, जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, रम्या कृष्णन, विनायकन, मिर्ना मेनन, तमन्ना, वसंत रवी, नागा बाबू आणि योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील गाणी अनिरुद्धने संगीतबद्ध केली आहेत.