सुपरस्टार रजनीकांत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा अभिनय आणि लगेच शिकण्याच्या कलेने खूप प्रभावित झाले आहेत. सोनाक्षी रजनीकांतसोबत एक तमिळ चित्रपट करत आहे. ती रजनीकांतसोबत ‘लिंगा’ या चित्रपटाने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण म्हैसूर येथे होत आहे .

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीची दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ही सुरुवात आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याच्या पद्धतींना तिने ज्या वेगाने आत्मसात केले आहे त्यामुळे रजनीकांतसह इतर सगळेच लोक प्रभावित झाले आहेत. सोनाक्षीसाठी ही एक विदेशी भाषा आहे. तरीही ती चित्रीकरणादरम्यान लगेच शिकून घेत होती आणि एक सीन पहिल्याच वेळेत पूर्ण करत होती.

या चित्रपटाचे दिग्दर्शक के.एस.रविकुमार आहेत. सोनाक्षी आणि अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिका साकारत असून ऑस्कर विजेता ए.आर.रहमान चित्रपटाला संगीत देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth fascinated by sonakshi sinhas work in tamil debut film lingaa
Show comments