सुपरस्टार रजनीकांत यांचा संभाव्य राजकारण प्रवेश यावर अनेक वेळा चर्चा होताना दिसून येते. अशीच चर्चा सध्या रंगत असून, स्वत: रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘कोचादैयान’ चित्रपटाच्या संगीत अनावरण कार्यक्रमादरम्यान वार्ताहरांनी आपण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी किंवा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरिवाल यांना येत्या लोकसभा निवडणुकीत सहाय्य करणार का, असा प्रश्न विचारला असता, अभिनेता रजनीकांत यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, पुढील महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ‘कोचादैयान’ चित्रपटाच्या वेगळेपणाविषयी बोलताना ते म्हणाले, हा चित्रपट ‘मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी’चा वापर करून बनविण्यात आलेला देशातील पहिलाच चित्रपट आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2014 रोजी प्रकाशित
अभिनेता रजनीकांत यांचा राजकारणाला नकार
सुपरस्टार रजनीकांत यांचा संभाव्य राजकारण प्रवेश यावर अनेक वेळा चर्चा होताना दिसून येते. अशीच चर्चा सध्या रंगत असून...

First published on: 10-03-2014 at 01:15 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra ModiबॉलिवूडBollywoodरजनीकांतRajinikanthलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movie
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth says no to politics