रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये दमदार ओपनिंग मिळाली. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटींची कमाई करत एक नवा रेकॉर्ड बनवला. रजनीकांत यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात ‘जेलर’ हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी रजनीकांत यांच्या चित्रपटाने तब्बल ५ विक्रम मोडीत काढले आहेत.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी मात्र रजनीकांत यांनी हिमालयात प्रस्थान केलं. कोविडमुळे त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासात खंड पडला होता, पण आता नुकतंच ‘जेलर’च्या प्रदर्शनाआधीच रजनीकांत हिमालयात गेल्याचं समोर आलं. आता नुकताच रजनीकांत यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत आपल्या आध्यात्मिक प्रवासाविषयी आणि ‘जेलर’च्या यशाबद्दल बोलताना दिसत आहेत.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…

आणखी वाचा : ‘जलसा’मधील ‘ही’ आहे अमिताभ बच्चन यांची आवडती जागा; ब्लॉगच्या माध्यमातून खुद्द बिग बींनी केला खुलासा

रजनीकांत यांनी आध्यात्मिक गरू दयानंद स्वामी यांच्या ऋषिकेश येथील आश्रमात हजेरी लावली यावेळी रजनीकांत यांनी त्यांच्या गुरूचा महिमा आणि एकूणच त्यांचा आध्यात्मिक अनुभव यावार भाष्य केलं. रजनीकांत म्हणाले, “जेलरकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. मी जेव्हा दयानंद स्वामी यांच्या आश्रमात आलो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले तेव्हा माझ्या डोक्यात सतत ‘जेलर’चा विचार सुरू होता. त्यावेळी स्वामीजी म्हणाले की काळजी नसावी चित्रपट यशस्वी होणार. स्वामीजी म्हणाले चित्रपट हिट होणार याहून आणखी काय हवं?”

नेल्सन दिग्दर्शित ‘जेलर’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चार दिवसांतच या चित्रपटाने ३०० कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेईल असंही म्हंटलं जात आहे. यामध्ये रजनीकांत जेलर ‘टायगर’ मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत. मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकादेखील आहेत.

Story img Loader