रजनीकांत यांचा बहुचर्चित चित्रपट जेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५० कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली होती. आता या चित्रपटाच्या चौथ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

हेही वाचा- Gadar 2 Leak on Youtube: सनी देओलला मोठा धक्का; ‘गदर २’ यूट्यूबवर लीक

Bigg Boss Marathi Varsha Usgaonker Eliminate midnight eviction
६७ दिवसांनी वर्षा उसगांवकर Eliminate! एक्झिट घेताना म्हणाल्या, “या घरात अपमान तोंडावर पचवायला…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ? मेष ते मीनपैकी कोणाचं चमकणार नशीब? वाचा तुमचं राशिभविष्य
Navrari 2024 weekly horoscope 30 september to 6 october 2024 saptahik rashibhavish
Weekly Horoscope : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार नवरात्र! ७ राशींना अचानक होईल धनलाभ; तुमच्यासाठी कसा असेला हा आठवडा?
bigg boss marathi time changes from 3 october
शेवटच्या आठवड्यात Bigg Boss Marathi ची वेळ बदलणार! नव्या मालिकेसाठी घेतला मोठा निर्णय; फक्त ३ दिवसांसाठी…
Navra Maza Navsacha 2 Box Office Collection Day 4
‘नवरा माझा नवसाचा २’च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घट, एकूण कलेक्शन १० कोटींपेक्षा कमी
Bigg Boss Marathi 70 days Grand finale
Bigg Boss Marathi : १०० नव्हे तर फक्त ७० दिवसांत संपणार पाचवा सीझन! ‘या’ दिवशी असेल ग्रँड फिनाले, जाणून घ्या…
Working 12-hour days can significantly affect the body and mind, leading to long-term health concerns
द ब्लफ’च्या शूटिंगदरम्यान आठवड्यातील सहा दिवस १२ तास काम करीत होती प्रियांका चौप्रा! शरीरावर काय होतो परिणाम; तज्ज्ञ काय सांगतात….

सॅकनिक’च्या रीपोर्टनुसार ‘जेलर’ने पहिल्याच दिवशी ५२ कोटी रुपयांची कमाई केली होती. यामध्ये तामिळनाडूमध्ये २३ कोटी, कर्नाटकमध्ये ११ कोटी, केरळमध्ये ५ कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून १० कोटी आणि इतर राज्यांतील ३ कोटी रुपयांचा समावेश आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २७ कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३४.३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

चौथ्या दिवशी या चित्रपटाने ३८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. केवळ चार दिवसांत या चित्रपटाने भारतात ३०० कोंटीचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत तब्बल ५ विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपटाची वाढती कमाई पाहता बॉक्स ऑफिसवर रजनीकांत या नावाची जादू आपल्याला अनुभवायला मिळत आहे.

हेही वाचा- Video: …अन् निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये अचानक रडू लागली प्रियांका चोप्रा, व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्रात ९०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जात आहे. नेल्सन दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रजनीकांत जेलर ‘टायगर’ मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांनीही छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे.