रजनीकांत यांचा बहुचर्चित चित्रपट जेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५० कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली होती. आता या चित्रपटाच्या चौथ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Gadar 2 Leak on Youtube: सनी देओलला मोठा धक्का; ‘गदर २’ यूट्यूबवर लीक

सॅकनिक’च्या रीपोर्टनुसार ‘जेलर’ने पहिल्याच दिवशी ५२ कोटी रुपयांची कमाई केली होती. यामध्ये तामिळनाडूमध्ये २३ कोटी, कर्नाटकमध्ये ११ कोटी, केरळमध्ये ५ कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून १० कोटी आणि इतर राज्यांतील ३ कोटी रुपयांचा समावेश आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २७ कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३४.३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

चौथ्या दिवशी या चित्रपटाने ३८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. केवळ चार दिवसांत या चित्रपटाने भारतात ३०० कोंटीचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत तब्बल ५ विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपटाची वाढती कमाई पाहता बॉक्स ऑफिसवर रजनीकांत या नावाची जादू आपल्याला अनुभवायला मिळत आहे.

हेही वाचा- Video: …अन् निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये अचानक रडू लागली प्रियांका चोप्रा, व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्रात ९०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जात आहे. नेल्सन दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रजनीकांत जेलर ‘टायगर’ मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांनीही छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth starrer jailer box office collection day four dpj
Show comments