रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये दमदार ओपनिंग मिळाली. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटींची कमाई करत एक नवा रेकॉर्ड बनवला. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, सुरुवातीच्या अंदाजानुसार गुरुवारी पहिल्या दिवशी जेलरने ५२ कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये तामिळनाडूमध्ये २३ कोटी, कर्नाटकमध्ये ११ कोटी, केरळमध्ये ५ कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून १० कोटी आणि इतर राज्यांतील ३ कोटी रुपयांचा समावेश आहे.

कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात ‘जेलर’ हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी रजनीकांत यांच्या चित्रपटाने तब्बल ५ विक्रम मोडीत काढले आहेत. बॉक्स ऑफिसवर रजनीकांत या नावाची जादू आपल्याला अनुभवायला मिळत आहे. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही ‘जेलर’ने जबरदस्त कमाई केली आहे.

pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”

आणखी वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री व माजी खासदार जया प्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा अन् पाच हजाराचा दंड; नेमकं प्रकरण काय?

‘सॅकनिक’च्या रीपोर्टनुसार ‘जेलर’ने दुसऱ्या दिवशी २७ कोटींची कमाई केली आहे. हा आकडा मिळून या चित्रपटाने दोन दिवसांत तब्बल ७५.३५ कोटींची कमाई केली आहे. पुढे येणारा लॉन्ग वीकेंड पाहता ही कमाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट पहिल्या तीन दिवसांतच १०० कोटींचा टप्पा पार करेल असं सांगितलं जात आहे.

चित्रपट वितरक आणि तमिळनाडूच्या थिएटर ओनर्स असोसिएशनचे प्रमुख तिरुपूर सुब्रमण्यम यांनी पीटीआयला चित्रपटाबाबत माहिती दिली. त्यानुसार राज्यात ९०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जात आहे. नेल्सन दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रजनीकांत जेलर ‘टायगर’ मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत. मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकादेखील आहेत.

Story img Loader