‘तामिळरॉकर्स’मुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची डोकेदुखी वाढत चालली आहे. गेल्या काही वर्षांत मोठमोठे चित्रपट ‘तामिळरॉकर्स’मुळे प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाइन लीक होत आहे. या पायरसीपासून खुद्द रजनीकांत यांचे चित्रपटही वाचू शकले नाही. आता त्यांचा ‘पेट्टा’ हा चित्रपटही अवघ्या काही तासांत लीक झाला आहे.

‘तामिळरॉकर्स’ च्या मायक्रोसाइट यापूर्वी अनेकदा ब्लॉक करण्यात आल्या आहेत असं असूनही या साइटवरून वारंवार चित्रपट लीक होतंच आहे. याचा सर्वाधिक फटका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला बसला आहे. यावर ठोस करवाई करा अशी मागणी वारंवार दिग्दर्शक, निर्माते करत आहेत मात्र ‘तामिळरॉकर्स’वर पूर्णपणे बंदी घालण्यात अपयश आलं आहे. ‘तामिळरॉकर्स’च्या हजारो मायक्रोसाइट्स आहेत त्यामुळे एक साइट ब्लॉक केल्यानंतर दुसऱ्यावरून चित्रपट लीक होत आहेत.

‘2.0’ चित्रपटच्यावेळी ‘तामिळरॉकर्स’च्या जवळपास ३ हजार मायक्रोसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या होत्या. मात्र असं असूनही ‘2.0’ लीक झाला होता. 2.0 बरोबरच रजनीकांतचा ‘काला’, ‘कबाली’ सारखे चित्रपटही ‘तामिळरॉकर्स’वरून लीक झाले होते.

Story img Loader