तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी आज वयाच्या ६३व्या वर्षामध्ये पदार्पण केले. बंगळुरू येथे रजनीकांत यांनी वाढदिवस साजरा केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
रजनीकांत यांच्या अतिशय जवळच्या सुत्रांकडून समजल्याप्रमाणे आज सकाळी रजनीकांत बंगळुरू येथे जाण्यासाठी निघाले होते. प्रत्येक वाढदिवसाला रजनीकांत चेन्नईपासून दुर जातात. मात्र, गेल्या वर्षी त्यांनी चेन्नई येथे चाहत्यांची भेट घेतली होती.
रजनीकांत यांच्या शुभचिंतकांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधत विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते. या स्टार अभिनेत्याची जीवनगाथा अतिशय रंजक असून, अभिनेता होण्या आधी रजनी बंगळुरू येथे बस वाहकाचे काम करत होते.  
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या पानावरील ‘प्रतिक्रिया येथे नोंदवा’ या सुविधेचा वापर करा.

Story img Loader