दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रजणीकांत यांची लेक ऐश्वर्या आणि जावई धनुष यांनी घटस्फोट घेतला आहे. १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते विभक्त झाले आहेत. त्या दोघांमध्ये असं काय झालं आहे की त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण असे म्हटले जाते की त्या दोघांच्या या निर्णयाने रजनीकांत हे चिंतीत आहेत. रजनीकांत यांची इच्छा आहे की धनुष आणि ऐश्वर्या यांनी पुन्हा एकदा एकत्र यावे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
१७ जानेवारी रोजी धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची बातमी सगळ्यांना दिली आहे. धनुषचे वडील कस्तूरी राजा यांनी ऐश्वर्या आणि धनुषच्या या निर्णयाला कौंटुबिक भांडण म्हटलं आहे. तर मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर रजनीकांत यांना मोठा धक्का बसला आहे.
आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले
Wion ने रिपोर्टनुसार, सुभाष के झा यांना एका सुत्राने दिलेल्या वृत्तानुसार रजनीकांत यांच्यावर त्यांच्या मुलीच्या घटस्फोटाचा मोठा परिणाम झाला आहे. रजनीकांत यांची इच्छा आहे की धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनी त्यांचे मतभेद बाजुला करत पुन्हा एकत्र यावे.
आणखी वाचा : नेटकऱ्यांंनी ट्रोल केल्यानंतर राजकुमार रावला पत्नीचा ‘तो’ फोटो करावा लागला डिलीट
असं म्हटलं जातं की हे पहिल्यांदा नाही की जेव्हा धनुष आणि ऐश्वर्यामध्ये भांडण झालं. दोघांमध्ये सतत मतभेद होत होते. तर धनुष आणि ऐश्वर्याचं नातं तुटण्याची वेळ पहिल्यांदा आली नाही तर या आधीही बऱ्याच वेळा अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत. पण रजनीकांत यांनी नेहमीच या सगळ्या गोष्टी सांभाळल्या आणि त्यांनी दोघांमध्ये बऱ्याचवेळा समझोता करण्याचा प्रयत्न केला. खरतर, रजनीकांत यांनी आता पर्यंत ऐश्वर्या आणि धनुषच्या या निर्णयावर कोणतीही वक्तव्य केले नाही.