रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘पेट्टा’ सिनेमा आज देशभरामध्ये प्रदर्शित झाला. रजनीकांत यांच्या सिनेमा आला आणि चाहत्यांनी तो साजरा नाही केला असं होणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच रजनीच्या चाहत्यांनी ‘पेट्टा’चेही अगदी उत्साहाने स्वागत केले आहे. आज पहाटे चार वाजता हा सिनेमा प्रदर्शित झाला. रात्रीपासूनच अनेक सिनेमागृहांबाहेर थलायवा रजनीच्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांनी रांगा लावल्या होत्या. पहाटेपासूनच अनेक चित्रपटगृहांबाहेर फटाके फोडून, नाच करुन अगदी दिवाळीसारख्या उत्साहात रजनींच्या सिनेमाचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी चाहत्यांनी रजनी यांचे मोठे कटआऊट्स लावले होते तर काही ठिकाणी चक्क चित्रपटगृहांना रोषणाई करण्यात आली आहे. एकंदरितच खऱ्या अर्थाने दक्षिण भारत आज रजनीफाईड झाला आहे. ट्विटवर अनेकांनी या ‘रजनी उत्सवा’चे व्हिडीओ शेअर केले आहेत. ट्विटवर पहाटेपासूनच #Petta, #Rajinikanth, #PettaFDFS आणि #Rajinified हे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत होते. चला तर पाहुयात कशाप्रकारे दक्षिण भारत रजनीमय झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिनेमाच्या यशसाठी मुंबईत प्रार्थना

रजनीचा सिनेमा येता तोची दिवाळी दसरा

थलायवाची एन्ट्री

आणि रजनीचे नाव झळकल्यानंतर

पहिल्या १५ मिनिटांमध्ये पैसा वसूल

चित्रपटगृहांबाहेर मोठी कटआऊट्स

चित्रपटगृहाला लायटिंग

जपानी चाहत्यांचा जल्लोष

पोस्टरसमोरच शुभमंगल

पहाटेपासूनचा उत्साह

मध्यांतरानंतरची दृष्ये

गर्दी गर्दी आणि गर्दीच

भल्या पहाटेचे सेलिब्रेशन

चित्रपटगृहांबाहेर एकच कल्ला

चेन्नईमधील कासी सिनेमागृहाबाहेरील दृष्य

नाच गाणे पारंपारिक वाद्ये अन् बरच काही

तुमचा विश्वास बसणार नाही पण ही गर्दी पहाटेची आहे

एकीकडे सगळा उत्साह ओसंडून वाहत असतानाच तेलगु भाषेतील पेट्टा हा चित्रपट आज आंध्रप्रदेशमध्ये प्रदर्शित करण्यात आला नाही. चित्रपट वितरकांना या चित्रपटासाठी पुरेशी चित्रपटगृहे उपलब्ध करुन देण्यास अडचणी येतील असे वाटल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आठवड्यात आंध्रप्रदेशमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार नसून रजनीच्या चाहत्यांना तेलगुमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी आणखीन काही दिवस वाट पहावी लागणार आहे.