लाल रंगाचा स्वेटर आणि मफलर घातलेला आणि गंगा (मंदाकिनी) चा आवाज ऐकून थक्क झालेला ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातील अभिनेता तुम्हाला आठवत असेल. तिच्या हातातून पडणारा कलश पडतो. तो तिला पकडण्यासाठी धावतो आणि तेव्हाच तो तिला पहिल्यांदा भेटतो. गोरी त्वचा आणि कुरळे केस असलेला हा अभिनेता होता राजीव कपूर. राज कपूर यांचा धाकटा मुलगा. रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचा भाऊ. कपूर घराण्यातील असा मुलगा, जो कधीच सुपरस्टार होऊ शकला नाही. राज कपूर यांनी मरेपर्यंत आपल्या मुलाचं नशीब बदलण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी ठरले. चित्रपट असो की वैयक्तिक आयुष्य, प्रत्येक ठिकाणी राजीव कपूर अपयशी ठरले.

राज कपूर बॉलिवूडचा शोमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांचा धाकटा मुलगा राजीव कपूर यांचा आज जन्मदिवस २५ ऑगस्ट १९६२ रोजी जन्मलेले राजीव फक्त एक अभिनेताच नाही तर निर्माता आणि दिग्दर्शकही होते. त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) बराच गाजला होता. राजीवने १९८३ मध्ये ‘एक जान है हम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यावेळी ते अवघे २१ वर्षांचे होते. बरोबर २ वर्षांनंतर त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा शेवटचा चित्रपट होता.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…

आणखी वाचा- मंदाकिनीने ४५ दिवस शूटिंग करूनही ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये राज कपूर यांना हव्या होत्या पद्मिनि कोल्हापुरे

राजीव यांनी १९८४ मध्ये ‘आस्कमन’, १९८५ मध्ये ‘लवर बॉय’ आणि ‘जबरदस्त’, १९८८ मध्ये ‘हम तो चले परदेस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले, मात्र सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. १९९० मध्ये त्यांनी दिलीप कुमार आणि रेखा यांच्यासह ‘आग का दरिया’ या चित्रपटात काम केले होते, पण तो प्रदर्शित झाला नाही. त्याच वर्षी त्यांचा ‘रिस्पॉन्सिबल’ प्रदर्शित झाला आणि त्यानंतर त्यांनी अभिनय सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवले.

आणखी वाचा- ‘राम तेरी गंगा मैली’मधील ‘त्या’ वादग्रस्त सीनवर ३७ वर्षांनंतर मंदाकिनी यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

१९८८ मध्ये राज कपूर यांचं निधन झालं. त्यानंतर राजीव कपूर १९९१ मध्ये ‘मेहंदी’ चित्रपटाचे निर्माते झाले. त्यांचा मोठा भाऊ रणधीर कपूर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यानंतर बरोबर ५ वर्षांनी १९९६ मध्ये त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं पण इथेही त्यांना यश मिळाले नाही. या चित्रपटाचे नाव ‘प्रेम ग्रंथ’ होतं, ज्यामध्ये ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर राजीव यांनी चित्रपटांपासून दूर राहण्यास सुरुवात केली. १९९९ मध्ये, त्यांनी ‘आ अब लौट चलें’ चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे दिग्दर्शन त्यांचे भाऊ ऋषी कपूर यांनी केले होते.

आणखी वाचा- Liger Movie Review : ना धड लायन, ना टायगर; जबरदस्ती जुळवून आणलेला अन् एक फिस्कटलेला प्रयोग म्हणजे ‘लाइगर’

राजीव यांचं व्यावसायिक जीवन अयशस्वी ठरलं, तसंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही फारसं चांगलं नव्हतं. राजीव यांनी२००१ मध्ये आर्किटेक्ट आरती सभरवाल यांच्याशी लग्न झाले होते, परंतु त्यांचे लग्न २ वर्षेही टिकू शकले नाही. २००३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नापूर्वी राजीव यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. अभिनेत्री दिव्या राणा, अभिनेत्री तृष्णा हिच्यासोबत त्यांचे अफेअर होते असे म्हटले जाते. प्रसिद्ध अभिनेत्री नगमासोबतही त्यांचे नाव जोडले गेले. ‘प्रेम रोग’च्या शूटिंगदरम्यान ते पद्मिनीला डेट करत असल्याचं बोललं जायचं. याशिवाय त्यांचे नाव ‘बॉर्डर’ फेम सपना बेदीसोबतही जोडले गेले होते. मात्र, लग्नानंतरही ते एकटे राहिले. घटस्फोटानंतर त्यांनी दुसरे लग्नही केले नाही.

९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी जेव्हा राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते त्यांचा भाऊ रणधीर यांच्या घरी होते. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे वय ५८ वर्षे होते.

Story img Loader