अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांच्यातील वाद मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांमधील संबंध सुधारल्याचं बोललं गेलं होतं. पण आता पुन्हा एकदा यांच्यातील वाद विकोपाला गेले असून त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोही डिलिट केले आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मुलगी जियानासाठी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मात्र यांच्या नात्यात पुन्हा दुरावा आल्याचं बोललं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारू आता या नात्यातून बाहेर पडण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. ते एकत्र आले आणि त्यांच्या वैवाहिक नात्याला आणखी एक संधी दिली. मात्र त्यांच्यातील मतभेद अद्याप कमी होत नाहीयेत. त्यामुळे आता दोघांमध्ये सर्वकाही ठीक होण्याची काहीच शक्यता नाही. मात्र याबाबत जेव्हा चारू असोपाशी प्रसारमाध्यमांशी संपर्क केला असता तिने यावर बोलण्यास नकार दिला. “मला यावर काहीच बोलायचं नाही.” असं ती म्हणाली.

आणखी वाचा- सुश्मिता सेनच्या भावाचे पत्नीवर गंभीर आरोप, समोर आलं घटस्फोटाचं धक्कादायक कारण

चारू असोपा सध्या तिच्या गावी बीकानेरला आहे. याच ठिकाणी तिने मुलगी जियानासाठी प्री-बर्थडे पार्टी ठेवली होती. याबाबत चारू म्हणाली होती, “१ नोव्हेंबरला जियाना १ वर्षाची होणार आहे. त्यासाठी आम्ही मुंबईमध्ये पार्टी ठेवणार आहोत. पण त्याआधी माझे आई-बाबा आणि भावंडांसाठी गावी एक छोटीशी पार्टी आयोजित करायची होती. आम्ही त्यासाठी बरीच शॉपिंग केली. डिनरसाठी बाहेर गेलो आणि खूप धम्माल केली. माझ्या आई-बाबांचं त्यांच्या नातीवर खूप प्रेम आहे.”

आणखी वाचा- उर्फी जावेद पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात? आधी केले गंभीर आरोप अन् आता म्हणाली “आय लव्ह यू”

दरम्यान राजीव आणि चारू यांनी काही दिवसांपूर्वीच फॅमिली फोटो शेअर करत त्यांनी घटस्फोटाचा निर्णय बदलला असल्याची आणि लग्नाला दुसरी संधी देत असल्याची घोषणा केली होती. यानंतर दोघंही पुन्हा प्रेमाने राहत असलेले पाहायला मिळाले. एकत्र जीमला जात होते. फॅमिली पार्टी आणि कार्यक्रम एन्जॉय करताना दिसत होते. यावेळी त्यांनी इन्स्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले होते. पण आता हे सर्व फोटो त्यांनी डिलिट केले आहेत. एवढंच नाही तर एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajiv sen and charu asopa sepration case both unfollow each other on social media mrj