बॉलीवूडच्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आता अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित चरित्रपट बनवणार आहे. सध्या या चित्रपटासाठीची प्राथमिक जुळवाजुळव सुरू असून पुढील वर्षी प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. चरित्रपटाच्या कथेवर काम सुरू असल्याची माहिती राजकुमार हिराणी यांनी पत्रकारांना दिली. या चित्रपटात संजुबाबाची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न विचारला असता अजून चित्रपटातील कलाकारांची निवड होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या कथेचे काम पूर्ण झाल्यानंतर पात्रांच्या गरजेनूसार कलाकारांची निवड करण्यात येईल, अशी माहिती राजकुमार हिराणी यांनी दिली. सुरूवातीला संजय दत्तच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र, मी फक्त रणबीरशी कथेविषयी बोललो आहे. तो चित्रपटात काम करणार की नाही, याबाबत कोणतीही निश्चिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader