राजकुमार राव बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा राजकुमार राव अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेतही असतो. आताही असंच काहीसं घडलंय ज्यामुळे राजकुमारच्या नावाची चर्चा बीटाऊनमध्ये होताना दिसत आहे. राजकुमार रावने मुंबईत एक आलिशान ट्रिपलेक्स अपार्टमेंट विकत घेतले आहे.

राजकुमार रावने नव्याने घरेदी केलेल्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल ४४ कोटी रुपये एवढी आहे. हे अपार्टमेंट मुंबईच्या जुहू भागात असून विशेष म्हणजे त्याने हे अपार्टमेंट अभिनेत्री जान्हवी कपूरकडून खरेदी केले आहे. राजकुमार आणि जान्हवीने ‘रुही’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात दोघांमध्ये उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली. जान्हवीने हे घर विकून करोडोंचा नफाही कमावला आहे.

आणखी वाचा- “यासाठी कोणाला शिक्षा…” रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर जान्हवी कपूरची प्रतिक्रिया

जवळपास २ वर्षांपूर्वी जान्हवी कपूरने हे अपार्टमेंट खरेदी केलं होतं. डिसेंबर २०२० मध्ये ३९ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं असं बोललं जात आहे. या व्यवहारातून जान्हवीला ५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. हे अपार्टमेंट ३४५६ स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. या अपार्टमेंटमध्ये एका स्क्वेअर फूटची किंमत जवळपास १.२७ लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे हा देशातील महागडा व्यवहार मानला जात आहे.

राजकुमार आणि त्याची पत्रलेखा यांनी यापूर्वी याच इमारतीच्या ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर एक अपार्टमेंट खरेदी केले होते. राजकुमार आणि जान्हवी यांनी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘रूही’मध्ये एकत्र काम केले होते. आगामी काळात दोघंही ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटातही दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत.

Story img Loader