दिग्गज कलाकारांनी नटलेला चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी. अशी पर्वणी लवकरच येणार आहे. बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन, हनहुन्नरी कलाकार राजकुमार राव आणि ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह हे तिघेजण स्क्रिन शेअर करणार आहेत. बिग बी, राजकुमार आणि नसिरुद्दीन यांना दिग्दर्शक कबीर कौशिक एकत्र आणत आहेत.

दिग्दर्शक कबीर कौशिकच्या आगामी चित्रपटात हे त्रिकूट दिसणार असल्याचं समजतंय. नवीन वर्षात त्याच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं कळतंय. या तिघांच्या अभिनयाने नटलेला चित्रपट पाहण्यासाठी अर्थातच प्रेक्षकसुद्धा उत्सुक असतील. या चित्रपटाचा विषय काय असेल आणि इतर कोणते कलाकार यामध्ये झळकतील हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. कबीर कौशिकने याआधी ‘सेहर’, ‘चमकू’, ‘हम तुम और घोस्ट’ आणि ‘मॅक्झिमम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

वाचा : सोनाक्षी सिन्हाविरोधात तक्रार दाखल

अमिताभ बच्चन सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. तर राजकुमारच्या हातात ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘मेंटल है क्या’ आणि ‘मेड इन चायना’ हे तीन चित्रपट आहेत. या तीन कलाकारांच्या तारखांची जुळवाजुळव होणं हीसुद्धा दिग्दर्शकासाठी तारेवरची कसरतच असते. तेव्हा कबीर कौशिक या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.