राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या वेब सीरीजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याने तब्बल ११ किलो वजन वाढवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला की, ‘माझ्या आधीच्या ‘सिटी लाइट्स’, ‘अलीगढ’ आणि ‘ट्रॅप्ड’ या चित्रपटांसाठी मला वजन कमी करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे मला जेव्हा वजन वाढवायला सांगितलं गेलं तेव्हा मला खूप आनंद झाला. मी मागील दीड महिन्यापासून खूप पिज्जा, मिठाई आणि जंक फूड खातोय आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत मला हेच करायचे आहे. मागील दोन महिन्यांपासून मी व्यायामही करत नाहीये.’

व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी राजकुमार नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करत असतो. ‘ट्रॅप्ड’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने सांगितले होते की, ‘ट्रॅप्ड चित्रपटासाठी मी जवळपास २०-२२ दिवस फक्त ब्लॅक कॉफी आणि दोन गाजर खात होतो.’ वेब सीरीजच्या शूटिंगनंतर पुन्हा वजन कमी करावे लागणार असल्याचे राजकुमारने सांगितले. या वेब सीरीजमध्ये राजकुमार राव त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री पत्रलेखासोबत पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिटीलाइट्स’ चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र भूमिका साकारली होती.

वाचा : आता प्रियांकाच्या ओठांवरही उठले प्रश्न

दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला राजकुमार राव नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत करत आहे. दहा मे पासून या वेब सीरीजची शूटिंग सुरू झाली आहे. नुकतंच राजकुमारने ‘बहन होगी तेरी’ आणि ‘राबता’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. ‘राबता’ या चित्रपटात त्याने ३२४ वर्षीय वृद्धाची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkummar rao increased weight by 11 kg for subhash chandra bose role