अभिनेता राजकुमार राव बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ‘लव सेक्स और धोखा’ हा त्याच्या सिनेकारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता असे म्हटले जाते. याच चित्रपटातून राजकुमारने त्याच्या सिनेकारकीर्दीची सुरुवात केली होती. हा चित्रपट राजकुमारने दिलेल्या एका न्युड सीनमुळे विशेष चर्चेत होता. परंतु या न्यूड सीनविषयी आपल्या आई-वडिलांना माहिती दिली तेव्हा काय झाले, त्याचा किस्सा खुद्द राजकुमार रावनेच सांगितला आहे.

काय होती राजकुमारच्या पालकांची प्रतिक्रिया?

दिबाकर बॅनर्जी यांनी लव सेक्स और धोखा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटात निवड झाल्यानंतर दोन दिवसांनी मी दिबाकर बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मला या न्युड सीन बाबत पूर्व कल्पना दिली. माझा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मी लगेचच त्यांना होकार दिला. परंतु त्यानंतर या न्यूड सीनबाबत आई-वडिलांना सांगायचे कसे ही एक मोठी समस्या माझ्या समोर उभी होती. दिग्दर्शकांबरोबर झालेल्या चर्चेनंतर मी घरी पोहोचलो आणि घाबरत घाबरत या बद्दल पालकांना सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे न्यूड सीनविषयी पालकांना सांगितले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अत्यंत सहज होती. मला सिनेमा मिळाला या गोष्टीवरच कुटुंबीय समाधानी होते. अशा शब्दात राजकुमार राव घडलेला किस्सा सांगितला.

राजकुमार रावने ‘लव सेक्स और धोखा’ याशिवाय शाहिद आणि ओमेर्टा या चित्रपटांमध्येही न्यूड सीन केले आहेत.