आजकाल अनेक चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याचे दिसत आहे. पण असे देखील चित्रपट आहेत ज्या चित्रपटांचे हक्क खरेदी करण्यास ओटीटी प्लॅटफॉर्म तयार नाहीत. यामधील एका चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्याने स्वत: ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत असणारा ‘शाहिद’ हा चित्रपट २०१३मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती हंसल मेहता यांनी केली होती. आता हंसल मेहता यांनी ट्वीट करत चित्रपटाचे हक्क कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मने खरेदी केले नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.
गोष्ट पडद्यामागची भाग २० : ‘एक दोन तीन’ गाण्याचं मेल व्हर्जन ते मन्नतमधील शूटिंग, ‘तेजाब’च्या पडद्यामागचे किस्से

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल

‘शाहिद हा चित्रपट #TIFF2012मध्ये प्रीमिअर झाला होता. चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्याशिवाय इतरही काही पुरस्कार मिळाले आहेत. IMDBने चित्रपटाला 8.2 रेटिंग दिले आहे. पण तरीही तो खरेदी करणारे कोणी नाही’ या आशयाचे ट्वीट हंसल मेहता यांनी केले आहे.

‘शाहिद’ हा चित्रपट त्यावेळी चर्चेत होता. फिल्म क्रिटिक्सने या चित्रपटाची प्रशंसा केली होती. या चित्रपटात राजकुमार रावसोबत मोहम्मद जीशान आयुब, प्रभलीन संधू आणि बलविंदर कौर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.