मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचे ध्येय ठरवणाऱ्या किती माता असतील हे ठरविणे अशक्यच, पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैत्यांचा नि:पात झाला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’ इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ यांचा आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या माता होत्या. प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या आयुष्यावर आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपट तयार केले आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात रूपेरी पडद्यावर जिजाऊ साकारणाऱ्या अभिनेत्रींबद्दल…
मृणाल कुलकर्णी
“स्वराज्याकडे वाकड्या नजरेतून बघणा-या कोणत्याही सैतानाची फत्ते होऊ द्यायची नाही…” आई भवानीच्या साक्षीनं जिजाबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी जेव्हा हे वाक्य बोलते, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. मृणाल कुलकर्णी म्हणजे ‘जिजाबाई’ हे जणू आता समीकरणंच बनलंय. नितीन सरदेसाई यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत मृणालनं साकारलेली राजमाता जिजाबाईची भूमिका कोण विसरेल ? शिवाजी महाराजांना घडवणारी राजमाता जिजाबाई, महाराज अफजलखानाला भेटायला जातांना चिंतेत असणारी आई, आपला मुलगा मुघलांच्या कैदेत असतांना त्यानं मिळवलेलं स्वराज्य कसोशीनं सांभाळणारी आई ते राज्याभिषेक सोहळ्याचे सुख तृप्त डोळ्यानं अनुभवणारी आई…अशी विविध रुपं या मालिकेत मृणालनं साकारली आहेत. प्रत्येक रुपात मृणालच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे. ‘फत्तेशिकस्त’ या मालिकेत तर त्या जिजाऊंची भूमिका अक्षरश जगल्या.
View this post on Instagram
प्रतिक्षा लोणकर
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर यांनी जिजाऊ मॉंसाहेब यांची भूमिका समर्थपणे पेलली आहे. दमदार अभिनय कौशल्य आणि प्रत्येक भूमिकेत प्राण ओतून प्रतीक्षा लोणकर यांनी जिजाऊंची भूमिका तितक्याच ताकदीने पेलली आहे.
View this post on Instagram
नीना कुलकर्णी
सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकांत काम करणाऱ्या त्या खूप ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. जितक्या कठोर परिस्थितीचा सामना जिजाऊंनी केला तितक्याच कठोरतेने अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी मालिकेत जिजाऊ साकारल्या आहेत.
View this post on Instagram
भार्गवी चिरमुले
सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने देखील जिजाऊंची भूमिका साकारली आहे. शौर्याचा इतिहास आणि मातेच्या शिकवणीतून स्वराज्यनिर्मितीचा आविष्कार तिने तिच्या अभिनयातून मांडलाय.
View this post on Instagram
पडद्यावरील ‘जिजाबाई’ बघितली की पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठी जनांच्या अंगात चैतन्य सळसळतं. जिजाऊंचा इतिहास घराघरात पोहोवण्यासाठी या सर्व अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.