तामिळचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या अश्विनने प्रदीर्घ चर्चा सुरू असलेला तिचा आगामी चित्रपट ‘कोचादैयान’चा पहिला लुक आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. या चित्रपटाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार यात रजनीकांतने डबल रोल भूमिका साकारली आहे. मागील महिन्यात रजनीकांत यांनी चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार विजेता ध्वनी मुद्रक रेसूल पोक्कुट्टी यांच्या बरोबर ध्वनीमुद्रण केले. या चित्रपटात रजनीकांत सोबत अभिनेत्री दीपीका पादुकोण आहे आणि हा चित्रपट प्रदर्शनाच्या टप्प्यात आहे. तसेच या चित्रपटाचे भारतातला पहिला ‘परफॉरमन्स कॅप्चरिंग टेक्नोलॉजी’ ३डी सिनेमा म्हणून प्रमोशन करण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेता जॅकी श्रोफ, आर.सारथ कुमार आणि नासर हे देखील आहेत. सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2013 रोजी प्रकाशित
रजनीकांतचा ‘कोचादैयान’मध्ये डबल रोल
तामिळचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या अश्विनने प्रदीर्घ चर्चा सुरू असलेला तिचा आगामी चित्रपट 'कोचादैयान'चा पहिला लुक आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला.

First published on: 22-04-2013 at 01:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnikanth in a double role in kochadaiyaan