जय भोले प्रॉडक्शन्स पुणे निर्मित व सुनील वाईकर दिग्दर्शित ‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटाचे निर्माते दत्तात्रय भागुजी हिंगणे हे असून या चित्रपटात पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत राजपाल यादव चमकणार आहेत.
‘दगडाबाईची चाळ’ हा कौटुंबिक विनोदी चित्रपट असून याची कथा आणि पटकथा ही सुनील वाईकर यांची असून संवाद अभिजीत पेंढारकर, गीतकार नचिकेत जोग आणि संगीतकार अद्वैत पटवर्धन हे आहेत. संकलन एडविन एन्थनी तर प्रॉडक्शन प्रदीप लडकत, छायांकन चारुदत्त दुखंडे हे करणार आहेत. या चित्रपटात राजपाल यादव यांच्यासह विशाखा सुभेदार, शिवानी सुर्वे, संग्राम साळवी, भूषण कडू, सुनील गोडबोले व मोहिनी कुळकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटाचे शूटिंग मुंबई-पुणे आणि अलिबाग येथे तीन सत्रांत पूर्ण करण्यात येईल.

Story img Loader