सोनी टीव्हीवरच्या ‘महाराणा प्रताप’ या मालिकेत पट्टराणी जयवंताबाईच्या भूमिकेत रंग भरणाऱ्या अभिनेत्री राजश्री ठाकूरने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि जयवंताबाई व राणा उदय सिंग यांच्या कथेवरच मालिका केंद्रित झाली असतानाही राजश्रीचे बाहेर पडणे बुचकळ्यात टाकणारे ठरले आहे.
राणा उदय सिंग यांची पट्टराणी आणि महाराणा प्रतापची आई म्हणून जयवंताबाई ही व्यक्तिरेखा पूर्णत: तत्त्ववादी, सोशीक पण कणखर अशी आहे. राजश्री ठाकूर या अभिनेत्रीने जयवंताबाईच्या भूमिकेत आपली चांगलीच छाप उमटवली होती. मात्र आता प्रकृतीचे कारण पुढे करत तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी राजश्रीने दिलेले कारण लक्षात घेऊन तिचा निर्णय स्वीकारला असल्याचे समजते. जयवंताबाई या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू केला असून रूपा गांगुली, नारायणी शास्त्री, श्रुती उल्फत आणि इरावती हर्षे यांच्याबद्दल सध्या विचार सुरू असल्याचे सोनी टीव्हीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा