हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर काही सुरेख चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील बरेच चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘हम आपके हैं कौन’. ९० च्या दशकात म्युझिकल हिट्सचा ट्रेंड आला असतानाच सूरज बडजात्या हा फॅमिली ड्रामा प्रकारातील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षातील सर्वाधिक कमाई केली होती. किंबहुना आजही टिव्हीवर हा चित्रपट लागला की अनेकजण ठाण मांडून बसतात. मल्टीस्टारर ‘हम आपके हैं कौन’मध्ये प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, त्यातही नावाजली गेली ती म्हणजे सलमान खान आणि माधुरी दीक्षितची ऑनस्क्रीन केमिस्ट्री. अशा या चित्रपटाला २३ वर्षे पूर्ण झाली आहे. त्याचाच आनंद धकधक गर्ल माधुरी दीक्षितने तिच्या फेसबुक अकाऊंटद्वारे व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा