आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात भरती आहेत. बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्याबाबत विविध माहिती समोर येत आहेत.

आणखी वाचा – बर्थ डे पार्ट्यांमध्ये ५० रुपयांसाठी काम करायचे राजू श्रीवास्तव, एक शो मिळाला अन्…

आता राजू श्रीवास्तव यांच्या मोठ्या भावाने त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी घरीच पूजेचं आयोजन केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजू यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून श्रीवास्तव कुटुंबीय आता देवाकडे प्रार्थना करत आहेत.

दिल्ली येथील राहत्या घरी राजू यांचे मोठे भाऊ डॉ. सीपी श्रीवास्तव एक विशेष पूजा करत आहेत. राजू श्रीवास्तव यांची पत्नी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने यामध्ये सहभाग घेतला आहे. ही पूजा जवळपास दोन दिवस सुरु असल्याचंही बोललं जात आहे. तसेच पुढील पाच दिवस ही पूजा सुरुच राहिल. राजू यांची पत्नी आणि मुलं देखील या पूजेद्वारा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

आणखी वाचा – “बॉलिवूड म्हणजे ड्रग्ज, दारू, सेक्स आणि…” हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रतिमेबाबत स्वरा भास्करचं स्पष्ट मत

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये राजू यांचं नाव आदराने घेतलं जातं. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’मध्येही सहभागी झाले होते. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यांसारख्या चित्रपटात काम केलं.

Story img Loader