Raju Srivastav Health Update : आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सतत त्यांचे चाहते आणि कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. तसेच डॉक्टर देखील अधिक मेहनत घेत आहेत. अशातच राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – तब्बल १५ दिवसांनंतर शुद्धीवर आले राजू श्रीवास्तव, प्रकृतीविषयी नवी माहिती समोर

राजू श्रीवास्तव यांना बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकवण्यात येत असल्याची माहिती देखील समोर आली होती. आता एएनआयच्या ट्विटनुसार राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली असल्याचं समोर आलं आहे. तब्बल १५ दिवसांनी राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आली आहे. शुद्धीवर येताच फक्त चार शब्दांमध्येच त्यांनी आपल्या पत्नीशी संवाद साधला.

आजतकच्या वृत्तानुसार राजू श्रीवास्तव यांचे मित्र अशोक मिश्रा यांनी सांगितलं की, “काल रात्री आम्ही सगळेच विनोदी कलाकार मित्र एकत्र भेटलो होतो. रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही सगळेच राजू यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत होतो. मी रात्री तीन वाजता झोपलो. मी झोपेतच असताना आशीष श्रीवास्तव यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले अशोक उठ. किती झोपणार? तुझा भाऊ तर आता जागा झाला आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला.”

आणखी वाचा – Video: महेश मांजरेकर घेऊन येत आहेत धमाल मराठी वेबसीरिज, तुम्ही टीझर पाहिलात का?

पुढे ते म्हणाले, “राजू श्रीवास्तव शुद्धीवर येताच पत्नीने काही न बोलता त्यांच्याकडे पाहिलं. राजू यांनी देखील अगदी कमी आवाजात हा मी ठिक आहे असं उत्तर दिलं.” राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरही हास्य आलं. तसेच विनोदी कलाकार आणि राजू श्रीवास्तव यांचे मित्र सुनील पालने देखील ही बातमी ऐकताच आनंद व्यक्त केला.

Story img Loader