Raju Srivastav Health Update : आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सतत त्यांचे चाहते आणि कुटुंबीय प्रार्थना करत आहेत.

आणखी वाचा – १५ दिवसांनंतर शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तव यांनी पत्नीला पाहता उच्चारले ‘ते’ चार शब्द, प्रकृतीत सुधारणा

तब्बल १५ दिवसांनी राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आली आहे. शुद्धीवर येताच फक्त चार शब्दांमध्येच त्यांनी आपल्या पत्नीशी संवाद साधला. राजू यांनी देखील अगदी कमी आवाजात हा मी ठिक आहे असं आपल्या पत्नीला उत्तर दिलं. पण राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आलीच नाही अशी माहिती आता समोर आली आहे.

राजू श्रीवास्तव यांचा भाचा कुशल श्रीवास्तव यांनी ईटाइम्सशी बोलताना सांगितलं की, “राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. पण त्यांना शुद्ध आली आहे यामध्ये काहीच तथ्य नाही. त्यांनी मध्येच डोळे उघडले तसेच त्यांच्या हाताची हालचाल झाली. पण फक्त इथवरच सुधारणा अपेक्षित नाही. त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं असं आम्हाला वाटतं. त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. राजू श्रीवास्तव यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी बराच काळ लागेल असं डॉक्टरांनी देखील सांगितलं आहे.”

आणखी वाचा – तब्बल १५ दिवसांनंतर शुद्धीवर आले राजू श्रीवास्तव, प्रकृतीविषयी नवी माहिती समोर

कुशल पुढे म्हणाले, “अजूनही ते व्हेंटिलेटरवर आहेत. सध्यातरी व्हेंटिलेटरशिवाय त्यांना असंच ठेवण्याची डॉक्टरांची कोणतीच योजना नाही. त्यांच्या प्रकृतीमध्ये अधिक सुधारणा झाल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल. पण त्यांच्यामध्ये सुधारणा होत आहे हे नक्की.” एकूणच काय तर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव अजूनही शुद्धीवर आले नाहीत. कुटुंबीय त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Story img Loader