Raju Srivastav Health Update : आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सतत त्यांचे चाहते आणि कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. तसेच डॉक्टर देखील अधिक मेहनत घेत आहेत. अशातच राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी कुटुंबीय करताहेत सलग दोन दिवस पूजा, नवी माहिती समोर

राजू श्रीवास्तव यांना बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकवण्यात येत असल्याची माहिती देखील समोर आली होती. आता एएनआयच्या ट्विटनुसार राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली असल्याचं समोर आलं आहे. तब्बल १५ दिवसांनी राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आली आहे. राजू यांचे सेक्रेटरी गर्वित नारंग यांनी त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.

रुग्णालयात भरती केल्यानंतर पंधरा दिवसांनी राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आली आहे. तसेच त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. असं गर्वित नारंग यांनी सांगितलं. राजू यांच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी तब्बल ५ दिवस सलग पूजा देखील केली. या पूजेमध्ये त्यांचे मोठे भाऊ, पत्नी आणि मुलांचाही समावेश होता. संपूर्ण श्रीवास्तव कुटुंब त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गरोदरपणात बिकिनीमध्ये केलं होत अंडरवॉटर फोटोशूट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.

Story img Loader