Legendary Comedian Raju Srivastava Died at 58 : सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचा कलाक्षेत्रामधील संपूर्ण प्रवास थक्क करणारा होता. आज दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहत आहेत. राजू यांचे असंख्य चाहते आहेत. अगदी शुन्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास नवोदीत विनोदी कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गजोधर आणि राजू भैया म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. स्टँडअप कॉमेडीपासून राजू यांच्या कलाक्षेत्रामधील प्रवासाला सुरुवात झाली. ‘टी टाईम मनोरंजन’ या टीव्हीवरील कार्यक्रमामधून त्यांनी कलाक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. विनोदी कार्यक्रम करण्यासाठी त्यांना फक्त ५० रुपये मिळत होते. ५० रुपयांसाठी ते अधिकाधिक मेहनत करत लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करत.

पाहा व्हिडीओ

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोने त्यांना विनोदी कलाकार म्हणून ओळख मिळवून दिली. या शोचे ते उपविजेता होते. त्यांनी साकारलेलं ‘गजोधर भैया’ हे त्यांचं पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याचबरोबरीने अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांची नकल करत प्रेक्षकांना त्यांनी खळखळून हसवलं.

आणखी वाचा – Comedian Raju Srivastava : राजू श्रीवास्तव गेले ४० दिवस शुद्धीवर आलेच नाहीत, रुग्णालयामध्ये नेमकं काय घडलं?

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोदरम्यानचाच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. युट्युबवर असलेला हा व्हिडीओ आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. या व्हिडीओला जवळपास ४ मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून खरा विनोदी कलाकार, उत्तम स्टँडअप कॉमेडीयन अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju srivastava death comedian old standup comedy video goes viral on social media see details kmd