Legendary Comedian Raju Srivastava Died at 58 : आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना लगेचच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. गेले ४० दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीबाबत सतत त्यांचे कुटुंबीय माहिती देत होते. पण बुधवारी सकाळी रुग्णालयामध्ये नेमकं काय घडलं? याबाबत त्यांच्या भाच्याने खुलासा केला आहे.

राजू श्रीवास्तव यांचा पुतण्या काय म्हणाला?

prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
Raj Thackeray Pays Tribute to Zakir Hussain
“तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल”, राज ठाकरेंची झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली; म्हणाले, “झाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच…”
Rahul Gandhi On Zakir Hussain Passed Away
Zakir Hussain Passed Away : “त्यांची कला सदैव आठवणीत राहील”, झाकीर हुसैन यांना राहुल गांधींनी वाहिली आदरांजली

“मंगळवार (२० सप्टेंबर) पर्यंत त्यांची प्रकृती इतर दिवसांसारखीच होती. ते लवकरच बरे होतील असंच आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. पण बुधवारी सकाळी त्यांना दुसऱ्यांदा कार्डिअ‍ॅक अरेस्ट आला. यावेळी मात्र ते या आजाराशी सामना करू शकले नाही.” असं राजू श्रीवास्तव यांचा भाचा कुशल याने ईटाइम्सशी बोलताना सांगितलं.

१० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यादरम्यान ते अचानक खाली कोसळले. रुग्णालयामध्ये भरती केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. हळूहळू त्यांच्या मेंदूनेही काम करणं बंद केलं. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी राजू यांच्या व्हेंटिलेटरचा पाइप देखील बदलला. त्यांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. शिवाय राजू यांना कोणत्याच प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून पत्नी शिखा आणि मुलगी अंतरालाही त्यांना भेटता येत नव्हतं. राजू यांना मध्येच ताप देखील येत होता.

आणखी वाचा – Comedian Raju Srivastava Death : गेल्या १० वर्षामध्ये तीन वेळा अँजिओप्लास्टी अन्…; राजू श्रीवास्तव यांच्या निधनामागचं कारण काय?

राजू श्रीवास्तव यांच्याकडून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद डॉक्टरांना मिळत नव्हता. त्यामुळे व्हेंटिलेटरवरच त्यांना ठेवण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून राजू यांच्या कुटुंबियांनी सलग तीन दिवस घरी पूजेचं आयोजन केलं होतं. पण डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने अधिक मेहनत करूनही राजू श्रीवास्तव यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.

Story img Loader